जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवेबाबत पर्यायी शिक्षक नियुक्ती आदेश-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवेबाबत पर्यायी शिक्षक नियुक्ती आदेश-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड/प्रतिनिधी
बीड शहरात ०८ दिवसांसाठी ९ जुलै रोजी रात्री १२.०० वा पर्यंत संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने प्रभाग व कॉलनीनिहाय दुकानांची यादी यापूर्वी जाहीर करणेत आली होतीे.
परंतु यापूर्वी आदेशानुसार नियुक्त काही शिक्षक अपंग , आजारी असल्याने त्यांच्या ऐवजी पर्यायी शिक्षक नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत,
नागरिकांना घराबाहेर पडून अत्यावश्यक
किराणा सामानांची खरेदी करणेस अडचण निर्माण होत असल्याने बीड शहरातील जिवनावश्यक किराणा सामानाची घरपोच सेवा देण्याच्या अनुषंगाने किराणा दुकानांची त्यांच्यासाठी नेमलेल्या दुकानांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होते. त्या संबंधित दुकानांचे नव्याने दिलेल्या पर्यायी शिक्षक नियुक्त केले आहे.
कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षता घेता संपूर्ण परळी शहरामध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणेत आली आहे. तसेच जिल्ह्यात देखील फौजदारी प्रक्रिया दंड संहिता
१९७३ चे कलम १४४ नुसार दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० वा पर्यंत प्रतिबंधात्मक लागू करण्यात आले आहे, सदर आदेश या आदेशासह लागू राहतील.