धारूर शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या पोलीसाचे दुर्लक्ष

Dharur

धारूर शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या पोलीसाचे दुर्लक्ष 

धारूर/प्रतिनिधी

धारूर शहरात पोलीस यंञणेच्या दुर्लक्षा मुळे शहरात भुरट्या चोऱ्या चे प्रमाण वाढले असून शुक्रवारी राञी घरासमोर लावलेल्या दोन दुचाकीचे टायर चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस यंञणेचे माञ याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
धारूर शहरातया महीण्यात भुरट्या चोऱ्या चे प्रमाण वाढले असून दुचाकी चाकी गाड्याचे टायर चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आसून घरासमोर लावलेल्या गाड्याचे प्रमाण आहे शुक्रवारी राञी मठगल्ली कसबा विभागात कुलदीप दरेकर यांचे घरासमोर लावलेल्या एम एच 44 व्हि 5739 दुचाकीचे दोन्ही टायर रिंग सह तर कटघर भागात दत्ता कापसे यांचे एम एच 44 व्हि 6058 दुचाकीचे दोन्ही टायर रिंग सह चोरीस गेले दोन्ही घटना शनिवारी सकाळी दिसून आल्या पंधरा दिवसा पुर्वी चार चाकी गाडी चे केज रस्त्या वर टायर चोरीस गेले होते या वाढत्या घटना मुळे शहरात भितीचे वातावरण पसरले असून चोरीची घटना घडल्या वर नागरीक तक्रार देण्यास गेले तर पोलीस त्यांना उलट तपासणी करण्याचे प्रकार घडत असल्याने नागरीकात भिती वाढत असून या घटना ही वाढत आहेत या मुळे शहरात माञ भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

Sharing