संकटाचे हे दिवस ही जातील असे...म्हणत अंजिक्‍यने लावले दिवे

देशात कोरोना आजाराचा कहर वाढत आहे. त्यात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन करून 5 एप्रिलच्या रात्री नऊ वाजता घराबाहेर दिवे लावून एकजुट दाखविण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला देशवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या आवाहनात मोठे सेलेब्रेटी, कलाकार तसेच क्रिडा विश्‍वातील खेळाडूंनी देखील प्रतिसाद दिला. यात भारतीय क्रिकेटपटू अजिंक्‍य रहाणेने देखील संकटाचे हे दिवस जातील असे दिवा लावून फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

देशभरातील विविध शहरांमध्ये रविवारी रात्री 9 वाजता लाईट बंद करुन लोकांनी दिवे आणि मोबाईलचे फ्लॅश चालू करत आपला पाठींबा दर्शविला.

अनेक सेलिब्रेटीही यात सहभागी झाले होते. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्‍य रहाणेनेही नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घराबाहेर एक दिवा लावला. दिवा लावतानाचा फोटो काढून तो सोशल मिडीयावर हे दिवसही जातील ! या आशयाची फोटोला ओळ देत अजिंक्‍यने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे असून हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे

Sharing