कोरोनामुळे क्रिकेट सोडून चहल आजमावतोय या खेळात नशीब

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता क्रिकेटची काही मैदाने कोरोना व्हायरसची तपासणी केंद्र झाली आहेत.

अशा परिस्थितीत भारतीय संघाचे खेळाडू आपापल्या घरात विश्रांती करत आहेत. परंतु भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आता बुद्धीबळ स्पर्धेत प्रवेश केला आहे. आपल्या गोलंदाजीने धडाकेबाज फलंदाजांना चिंतेत टाकणारा चहल क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी बुद्धीबळपटू होता.

चेस डॉट कॉमद्वारे आयोजित केलेल्या ऑनलाईट ब्लिट्झ स्पर्धेत (online blitz event) चहलने रविवारी (५ एप्रिल) भाग घेतला होता. चहलने जागतिक युवा बुद्धीबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

तसेच जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या वेबसाईटमध्ये त्याचा समावेश आहे. चहलची ईएलओ रेटिंग १९५६ आहे.

चहलने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ता आणि आंतरराष्ट्रीय मास्टर राकेश कुलकर्णीबरोबर चर्चा केली. यावेळी तो म्हणाला की, "बुद्धीबळ स्पर्धेने मला संयम बाळगण्यास शिकविले. क्रिकेटमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी करत असाल परंतु तुम्हाला विकेट मिळेलच असे नाही."

"समजा तुम्ही कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली परंतु जर विकेट मिळाली नाही. तेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा गोलंदाजी करावी लागते. त्यामुळे तुम्हाला संयम बाळगण्याची आवश्यकता असते. बुद्धीबळ (Chess) या खेळाने माझी यामध्ये खूप मदत केली. मी संयम बाळगून फलंदाजांची विकेट घ्यायला शिकलो," असेही चहल यावेळी म्हणाला.

बुद्धीबळ हा खेळ सोडून क्रिकेट निवडण्याबद्दल प्रश्न विचारला असता चहल म्हणाला की, त्याला क्रिकेटची फार आवड होती. भारतासाठी त्याने ५२ वनडे आणि ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

चहल पुढे म्हणाला की, "मला बुद्धीबळ आणि क्रिकेट यामध्ये एका खेळाची निवड करायची होती. मी माझ्या वडिलांशी चर्चा केली. त्यावेळी ते मला म्हणाले की, तुला जे आवडेल ते निवड. त्यावेळी मला क्रिकेटमध्ये जास्त रस होता. त्यामुळे मी क्रिकेट निवडले."

आयपीएल २०२० चे आयोजन झाले असते तर चहल विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bengalore) संघाकडून खेळताना दिसला असता. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तो घरात परिवारासोबत वेळ घालवत आहे.

आपल्या परिवाराबद्दल बोलताना चहल म्हणाला की, "मला परिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अनेक वर्षांनंतर मी माझ्या घरी असा वेळ घालवत आहे. हा चांगला आणि नवीन अनुभव आहे. मी रात्री उशिरा झोपतो. तसेच सकाळी उशिरा उठतो. संध्याकाळी परिवारातील सदस्यांबरोबर वेळ घालवतो."

आपल्या आदर्श गोलंदाजाबद्दल बोलताना चहलने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे (Shane Warne) नाव घेतले. याव्यतिरिक्त चहलला जेव्हाही वेळ मिळतो त्यावेळी तो बुद्धीबळाचे व्हिडिओ पाहतो आणि ऑनलाईन गेम खेळतो. चहलने इंग्लंडमध्ये २०१९च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसची विकेट घेतली होती. त्यावेळी त्याने या विकेटला आपली आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ विकेट म्हणून निवडले. यावेळी चहल म्हणाला की, "हा माझा पहिला विश्वचषक होता. मी फाफला बाद केले. त्याची विकेट ही सामन्यातील महत्त्वाची विकेट होती."

आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना चहल म्हणाला की, "मी गोलंदाजी करताना अनेक योजना बनवतो. तसेच यष्टीरक्षकाशी चर्चाही करतो. जसे की मी माही भाईला (एमएस धोनी) (MS Dhoni) सांगत होतो की, मी कशाप्रकारे गोलंदाजी करणार आहे

Sharing