भरधाव वेगाने जाणार्या टमटमच्या धडकेने एकजण जागीच ठार

भरधाव वेगाने जाणार्या टमटमच्या धडकेने एकजण जागीच ठार
पात्रुड/वृत्तसंस्था
पात्रुड पासुन जवळ असलेल्या खामगांव पंढरपुर हावे वर पहाटे ५.३० च्या सुमारासखारी तोस विक्री करण्यासाठी शिंदेवाडी फाट्यावर मोटर सायकल रोड चे बाजुला उभे करुन खारी विकत असताना भरधाव वेगाने टमटम ने धडक दिल्याची घटना घडली.
तेलगाव कडे जाणार्या टमटमने जोराची धड़क दिल्याने शेख अन्वर हे जागीच ठार झाल्याने पात्रुड भागात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की भरधाव वेगाने टमटम मध्ये वाळू चोरून जाता होता भरधाव वेगात टमटम ने रोडच्या बाजुला खारी विकत असणार्या जोराची धडक दिली व तो जागीच ठार झाल्याची घटना घडली.
वाळू माफिया मुळे एका व्यक्तीचा जीव गमावला आहे यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे रात्री-बेरात्री वाळू माफीया कडुन अशी घटना होतेच परंतु प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे
प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पात्रुडचे सरपंच अॅड.कजीम मनसबदार व उपसरपंच शेख युसुफ यांनी पात्रुड जमादार हराळे यांना घेऊन घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला व मयत बॉडी ला पि .म साटी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पुढील तपास पोलिस करीत आहे.
