छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे वेबीनार संपन्न

छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे वेबीनार संपन्न
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथे दि.25.07.2020 रोजी कोरोना 19 मुळे दुग्ध व्यवसाय व अन्न प्रक्रिया उद्योग यांच्या समोरील आव्हाने या विषयावर वेबीनार चे आयोजन करण्यात आले होते या वेबीनारसाठी प्रा. डॉ. जॉन डेव्हिड अधिष्ठाता वार्नर कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी सॅम हिंगीनबॉटन कृषी तंत्रज्ञान व विज्ञान विद्यापीठ प्रयागराज उत्तर प्रदेश हे लाभले होते. डॉ. जॉन डेव्हिड यांनी अन्न प्रक्रिया व दुग्धव्यवसाय या उद्योगावर कोरोना या महामारीमुळे झालेल्या परिणामाचे सखोल असे विवेचन केले व भविष्यात उद्योगाबाबत येणाऱ्या संभाव्य अडचणी वर कशाप्रकारे मात करता येईल या बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. या वेबीनार च्या माध्यमातून त्यांनी कोरोना 19 या महामारीतुन वाचण्यासाठी घ्यावयाच्या काळजीचे सविस्तर विवेचन केले या वेबीनार मध्ये महाराष्ट्रातिल, भारतातील अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, व्यवसायिक यांनी सहभाग नोंदविला होता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भिमराव धोंडे, संचालक अजय धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत, प्राचार्य श्रीराम आरसुळ, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रा. डॉ. जॉन डेव्हिड यांच्या बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
