अंबाजोगाई शहरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी अटकेत, सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई शहरात घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपी अटकेत, सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
बीड प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात झालेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अंबाजोगाई शहर पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन (वय 65, व्यवसाय – व्यापार, रा. ए. पी. जी. पार्क शादीखान्याजवळ, बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 29 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 1.25 वाजता अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील 4 लाख रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 7 लाख 7 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, असा एकूण 11 लाख 7 हजार रुपयांचा माल चोरून नेला.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 34/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 331(4), 305, 112, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तात्काळ तपास सुरू करून पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटवली. त्यामध्येपठाण मोहम्मद रियाज खान मोहम्मद इकबाल मोहम्मद (वय 25, रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई),सलमान मुस्तफा शेख (वय 31, रा. झारे गल्ली, अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.यातील आरोपी पठाण मोहम्मद रियाज यास गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत 30 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये रोख व सव्वा तोळे सोन्याचे गलसर, असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसरा आरोपी सलमान मुस्तफा शेख यास 1 फेब्रुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 52 ग्रॅम सोने व 537 ग्रॅम चांदी, असा अंदाजे 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 लाख 10 हजार रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई नवनित कांवत, पोलीस अधीक्षक बीड, चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई,ऋषिकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक (उपविभागीय) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासामध्ये पोलीस निरीक्षक शरद जोंगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, तसेच पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, श्रीकृष्ण वडकर, तेजस वाव्हुळे, पांडुरंग काळे, हनुमंत चादर, युवराज राठोड, सुशांत गायकवाड व भागवत नागरगोजे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत.








