त्या जिद्दी विद्यार्थ्याचा गौरव पुढील शिक्षणा साठी मानवलोक सह इतर संस्था करणार सहकार्य

त्या जिद्दी विद्यार्थ्याचा गौरव पुढील शिक्षणा साठी मानवलोक सह इतर संस्था करणार सहकार्य
धारूर/ईरफान शेख
घरात वडीलाचे अधार छञ हरवले असताना परीस्थीती वर मात करत तालूक्यातील कासारी येथील चैतन्य आशोक खाडे यांने दहावी बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यश संपादन केल्या बद्दल धारूर येथे त्यांचा गौरव करून त्यांचे पुढील शिक्षणा साठी मानवलोक व इतर संस्था मदती करता पुढे आल्या आहेत .त्यांचे शिक्षणातील अडचन दुर झाली आहे.
तालूक्यातील कासारी येथील विद्यार्थी चैतन्य अशोक खाडे याने दहावी परीक्षेत 93 25 टक्के गुण घेतले असून तो सासुबाई विद्यालय मांडी खेड येथे होतं वडिलांच्या निधनानंतरही त्याने जिद्दीने हे यश मिळवले आई शेतीत काम करते घरची परीस्थिती हालाखीची माञ दहावी पर्यंतचे शिक्षण अजोळी पुर्ण केले. दहिवीत घवघवीत यश संपादन केल्या वर पुढील शिक्षणाचा माञ प्रश्न निर्माण झाला होता त्यांचे या कठीण परीस्थीत पित्याचे छञ हरवलेले असताना मिळवलेल्या यशा बद्दल धारूर येथे बोलवून पञकार अनिल महाजन गटनेते सुधिर शिनगारे नगरसेवक बालाजी चव्हान पञकार अतूल शिनगारे संतोष भोसले आदी च्या उपस्थीत या गुणवंत विद्यार्थ्याचे कौतूक करून गौरव करण्यात आला.
या चैतन्य खाडे च्या पुढील शिक्षणा साठी सहकार्य म्हणूण मानवलोकया संस्थेने पुढाकार घेतला असून मानवलोक व इतर संस्था मदती साठी सरसावल्या असून यामुळे त्यांचे पुढील शिक्षणातील अडथळा दुर झाला आहे .चैतन्या खाडे यांचे यावेळी डोळे पानावले होते भावीकाळात वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचा भावना त्यांने व्यक्त केल्या.
