अत्यावश्यक सेवा वगळून किल्ले धारूर शहर काही दिवसांसाठी बंद करावे - गणेश थोरात

Dharur

अत्यावश्यक सेवा वगळून किल्ले धारूर शहर काही दिवसांसाठी बंद करावे - गणेश थोरात

किल्लेधारुर/प्रतिनीधी

किल्लेधारुर शहरात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश थोरात यांनी न काल दि.4/08/2020 तहसीलदार व्ही.एस.शिडोळकर  यांना निवेदन दिले
किल्ले धारूर शहरात तीन दिवसा मध्ये  तब्बल नऊ जन कोरोना बाधित आढळून आले आहेत. शहर आणि तालुक्यात कोरोना पेशंटची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून समस्त नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून आपण परिश्रम घ्यावते.
काल सकाळी एका कोरोना व्यक्तीचे दुःखद निधन ही झाले,त्यामुळे समस्त शहरवासीयांच्या आरोग्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या काळजी खातर आपण फक्त कोरोना संबंधित क्षेत्र बंद न करता संपूर्ण किल्ले धारूर पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्यासाठी दखल घेण्यात यावी.असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

Sharing