ऑनलाईन करिअर मार्गदर्शन व कल चाचणी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम

ऑनलाईन करिअर मार्गदर्शन व कल चाचणी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम
बीड/ प्रतिनिधी
जिल्हयातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर पुढे काय याबाबत तसेच १० वी व १२ वी नंतरच्या करिअर संधीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन मानसशास्त्रीय कल चाचणीच्या आधारे करण्यात येणार आहे.
१० वी व १२ वी च्या। जास्तीत जास्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. त्याच बरोबर याद्वारे जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळा आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या विद्यालयातील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातुन किंवा इतर माध्यमातुन या उपक्रमाबाबत अवगत करावे. या उपक्रमामध्ये डॉ. अनिल जाधव, यंग प्रोफेशनल, मॉडेल करीअर सेंटर, उस्मानाबाद हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आपण https://forms.gle/huTf3GPXXGgLcFE79
या लिंकवर उपलब्ध करुन दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये माहिती भरावी. असे आवाहन सहायक आयुक्त (प्र.), जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी केले आहे
या मार्गदर्शनाबाबतची दिनांक व वेळ आपणास नोंदणीनंतर कळविणे या कार्यालयास सोईचे होईल. सदरील मार्गदर्शन सत्राची वेळ व दिनांक आपण नोंदवीलेल्या संपर्क क्रमांकावर मॅसेजद्वारे तसेच ईमेल आयडी वर ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच सदरील मॅसेजमधील किंवा ईमेल मघील लिंक वर क्लिक करुन आपणास मादर्शनाचा लाभ घेता येईल.
