सरवर पिंपळगाव येथील युवकांच्या वतीने जी प शाळा परिसरात स्वच्छता

Beed

सरवर पिंपळगाव येथील युवकांच्या वतीने जी प शाळा परिसरात स्वच्छता

प्रतिनिधी/शेख अबुजर
    
कोरोनाच्या महामारीमुळे मागील तीन महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यात शाळा ही पूर्णतः बंद आहे 
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळेच्या परिसरात गवत व झुडपे वाढली होती. 
भारताचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गावातील युवकांनी पुढाकार घेत स्वतः शाळेच्या परिसरातील गवत,झुडुपे,काढून एक आदर्श निर्माण केला.
शाळा बंद असल्यामुळे शाळेत ना विद्यार्थी ना शिक्षक. मग परिसर स्वच्छ कोण करणार ? हा मोठा प्रश्न होता. पण आपल्या  गावातील शिक्षणप्रेमी,देशप्रेमी तरुण राहुल गोरे,आकाश गोरे  महेश तुंभारे,मनोज पवार आदी तरुणांनी कोणी सांगण्याची वाट न पाहता , परिस्थिती लक्षात घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला आणि आपल्या गावातून शाळेसाठी  व सामाजिक कार्यासाठी सहकार्य मिळत नाही हा लोकांच्या मनात असलेला गैरसमज दूर केला. गावातील लोकं सहकार्य करत नाहीत असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे , ते आपण शाळेसाठी , गावासाठी , देशासाठी केलं पाहिजे. असाच संदेश या तरुणांनी आपल्या गावातील लोकांना कृतीतून दिला आहे. अशा छोट्या छोट्या कृतीतूनच मोठी मोठी कामे होत असतात. या तरुण मित्रांच्या कार्यातून गावातील लोकांनी योग्य संदेश घेऊन आपल्याला जे शक्य आहे ते योगदान गावासाठी दिल्यास सरवर पिंपळगाव , एक आदर्श गाव म्हणून  जगाच्या नकाशात नक्कीच झळकेल. मोठ्या  प्रवासाची सुरूवात एक  पाऊल पुढे टाकूनच होत असते. या तरुणांनी टाकलेलं पाऊल हे आदर्श   गावाच्या प्रवासातील पहिले पाऊल ठरावं आणि गावातील लोकांनी याच पाऊलावर पाऊल टाकून आदर्श गाव , आदर्श शाळा निर्मितीचा प्रवास यशस्वी करुन गावचा लौकिक वाढवावा .
               

सन्मानासाठी काम करायची गरज नसते. योग्य काम केल्यास आपोआप सन्मान मिळतो. आपण सन्मानाच्या मागे लागायची गरज नाही , सन्मान आपल्या मागे लागला पाहिजे.असा संदेश शिक्षणप्रेमी , देशप्रेमी तरुण राहुल गोरे,  अकाश गोरे महेश तुंभारे,  मनोज पवार या  तरुणांनी शाळेच्या परिसरात स्वच्छ ता केल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
                     

जी प शाळेच्या परिसरात केलेल्या स्वच्छ्ता बाबद त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्याण जामकर.मुख्यध्यापाक श्री अश्रोबा बोर्डे यांनी अभिनंदन केले आहे..

Sharing

Visitor Counter