नगरसेवक फक्त नावालाच? नगरसेवक साहेब लोकांना त्रास देऊन स्वतःला आनंद मिळतो का?

नगरसेवक फक्त नावालाच का? नगरसेवक साहेब लोकांना त्रास देऊन स्वतःला आनंद मिळतो का?
प्रतिनिधी/सय्यद समीर
बीड मोमीन पुरा भागात वार्ड क्रमांक २० मध्ये अमीर कॉलनी व मोहम्मदीया कॉलनी या भागामध्ये रस्त्यावर पावसामुळे मोठमोठेखड्डे झाले असुन या खड्यात पावसाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे.
नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे लोकांनी वारंवार नगरसेवकाला सांगितले तरी नगरसेवक यांच्या समस्येचा काहीच फरक पडत नाही मग नगर सेवक फक्त नावा पुरतेच का? असा प्रश्न नागरीकांना निर्माण झाला आहे.
एवढांच नव्हे तर गटार सुद्धा वेळेवर स्वच्छ होत नाही ना साफ होते लोकांनी घरचा कचरा कुठे टाकावे असा प्रश्न पडतो कुठे ही टाकला तर तो फिरून घरा समोरच येतो व नाल्या कचर्याने गच्च होतात तरी स्थानिक नगर सेवकाला काहीच फरक पडत नाही? नगर सेवक फक्त मतदानाच्या वेळेसच जागा होतो का? असा सवाल उपस्थित होतो .
नगर सेवक साहेब आम्ही माणसंच आहोत,लक्षात राहील सर्व काही स्थानिक नागरीकांचा आक्रोश
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज कोरोना सारख्या आपत्तीला लढण्यासाठी प्रशासन कठोर प्रयत्न करत आहे जागोजागी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु याठिकाणी बीड मोमीन पुरा भागात वार्ड क्रमांक २०मध्ये कसलीच स्वच्छता दिसत नाही ना नगराध्यक्ष ला नाही नगर सेवकला अता स्थानिक नागरीकांचा लक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या कडे लागलेला आहे व लोकांकडून मागणी होत आहे की त्यांनी वार्ड क्रं.२०मध्ये येऊन स्वतः पाहणी करावी.
