मोमीन पुरा प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात :-अॅड शेख फेरोज
Beed

मोमीन पुरा प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात :-ऍड शेख फेरोज
बीड/प्रतिनिधी
सध्या संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे त्रस्त आहे,परंतु बीड नगर परिषदेला मोमीन पुरा प्रभाग क्रमांक 20 च्या नागरिकांच्या आरोग्याशी काही ही देणे घेणे नाही मागील दोन महिन्या पासून मोमीन पुरा येथील कचऱ्याची व नाल्यांची साफ सफाई केलेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या मुळे वायरल रोगराई पसरलेली आहे.नाल्यांची साफसफाई केलेली नसल्यामुळे इथे रस्त्यावर गुढग्या एवढे पाणी साचलेले आहे प्रभाग क्रमांक 20 इथे जागो जागी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नगर परिषदेने लवकरात लावकर साफ़ सफाई करून घेणे चे आदेश देणेत यावे
