ओंकार अंसुरकर व सतिष जाधव या गुरुशिष्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा भारती ठाणे, संस्थेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

ओंकार अंसुरकर व सतिष जाधव या गुरुशिष्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा भारती ठाणे, संस्थेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
व्दारा - प्रा रावसाहेब राशिनकर ( अहमदनगर विशेष प्रतिनिधी )
राष्ट्रीय क्रीडा दिन व स्व.मेजर ध्यानचंद यांचा जयंती दिन क्रीडा भारती ठाणे या संस्थेतर्फे सोशल डिस्टन्सिंग पाळून ऊत्साहात साजरा करण्यात आला .वामनराव ओक रक्तपेढी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटु श्री ओंकार अंसुरकर हे उपस्थित होते व महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे गुरूवर्य श्री सतिष जाधव ही या प्रसंगी उपस्थित होते.गुरू शिष्य जोडी उपस्थित राहिल्याने सर्वांनाच आनंद वाटला. प्रथमतः जिल्हा मंत्री श्री मनिष नाखवा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते श्री हनुमंत ,भारतमाता ,मेजर ध्यानचंदजींच्या प्रतिमांचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला . अतिथींचा परिचय करून देण्यात आला ,प्रमुख अतिथींच्या मनोगतानंतर क्रिडा भारती प्रांत प्रचारक श्री यादवजी यांचे गीतगायन संपन्न झाले सर्व उपस्थित मान्यवरांनी आपआपला परिचय करून दिला .श्री राजेंद्र गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले
