श्री.ज्ञानेश्वरी हा ग्रथ अभिनव व नित्य- नुतन आहे

श्री.ज्ञानेश्वरी हा ग्रथ अभिनव व नित्य- नुतन आहे
पाटोदा/वार्ताहर
येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान पाटोदा येथे दि ०८/०९/२०२० रोजी श्री ज्ञानेश्वरी जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्री सुनील खाडे यांनी ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित तयार केले. त्यांच्या प्रकाशन प्रसंगी श्री.ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रेरणा देणारा, अभिनव असून नित्यनुतन आहे. म्हणूनच श्री.खाडे यांना त्यांचे लेखन करण्याची प्रेरणा मिळाली असे मत व्यक्त केले. सर्व प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी पूजन व श्री संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. म.द.क्षीरसागर, श्री आप्पासाहेब राख,लेखक श्री सुनील खाडे, श्री छगनराव मुळे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. म.द.क्षीरसागर म्हणाले की,श्री खाडे यांच्या जीवनातील हा भाग्याचा क्षण आहे. त्यांना या लेखनाने जीवनात आत्मवैभव प्राप्त होईल. संतकृपा झाल्यावर जीवनात उणीव राहत नाही. श्री खाडे यांनी लेखनासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागतील असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीश महाराज म्हणाले की,आज अपूर्व योगायोग आहे.७३० वर्षानी या लाॅकडाॅऊन च्या काळात पुन्हा एकदा हस्तलिखित ज्ञानेश्वरीचे प्रकाशन करण्याचा योग आला. हे सर्वांचे भाग्य आहे. श्री खाडे यांचे जीवन सफल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी अत्यंत कमीत कमी श्रोते उपस्थित होते.
या वेळी श्री सुनील खाडे यांचा ह.भ.प.सतीश महाराज, डॉ. म.द.क्षीरसागर, व श्री आप्पासाहेब राख यांनी शाल, श्रीफळ,फेटा व हार देऊन सत्कार केला.
श्री विजय जोशी नगरसेवक नगर पंचायत पाटोदा यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करून या छोटेखानी कार्यक्रमाची रंगत वाढविली लेखक श्री सुनील खाडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त केले.यावेळी पाटोद्यातील प्रतिष्ठित मंडळी, महिला भगिनी व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
