अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षा 18 ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत

Beed

अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षा  18 ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत

बीड/प्रतिनिधी 

अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षा 110 चे वेळापत्रक www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द झाले असून पात्र शिकाऊ उमेदवारांनी त्यांच्या प्रोफाईल मधून परीक्षेचे प्रवेश दि. 10 सप्टेंबर 2020 ते 21 सप्टेंबर 2020 या कालावधीत प्राप्त करावे अथवा संबंधित अस्थापनेशी संपर्क करुन प्रवेश पत्र प्राप्त करावे. शिकाऊ उमेदवारी परीक्षा दि. 18 सप्टेंबर 2020 ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. याची सर्व आस्थापना व शिकाऊ उमेदवारांनी नोंद घ्यावी असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औ.प्र.संस्था, बीड यांनी कळविले आहे.

Sharing

Visitor Counter