कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकाराना कोरोना योद्धे म्हणून ५० लाख रुपयांची मदत करावी

राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून द्यावा
कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकाराना कोरोना योद्धे म्हणून ५० लाख रुपयांची मदत करावी
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी
आष्टी/प्रतिनिधी
राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून व कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून राज्यातील कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार वैभव मंहिद्रकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील अनेक पत्रकार कोरोना बाधित असून काही जणांचे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत.त्यामुळे त्या पत्रकारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अशा पत्रकारांच्या कुटुंबाला सरकारने प्रत्येकी पन्नास लाख रु. ची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच कोरोना बाधित पत्रकारांच्या कुटुंबाला दहा लाख रु.ची तातडीने मदत करावी कोरोना बाधित पत्रकारांसाठी स्वतंत्र कोवीड कक्षाची व्यवस्था करण्यात यावी तसेच राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून द्यावा तसेच पत्रकारांना बस प्रवासात सवलत द्यावी या मागणीसाठी तहसीलदार आष्टी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख, सचिव अविशांत कुमकर,कार्याध्यक्ष जावेद पठाण, सहसचिव अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, मनोज सातपुते, बबलु सय्यद, सजय खंडागळे, अण्णासाहेब साबळे, बाळु राऊत, तुकाराम भवर, कासम शेख, अतुल जवणे, तुकाराम गणगे,संतोष ससाणे निवेदनावर आदींच्या सह्या आहेत. या निवेदनाची प्रतिलिपी,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी बीड, यांना देण्यात आली आहे.
