राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार-सय्यद अंजूम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणार-सय्यद अंजूम
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेचे व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिल असे पाटोदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सय्यद अंजूम यांनी सांगितले आहे
आताच काही दिवसांपूर्वी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटोदा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे ते समाजसेवेत सदैव अग्रेसर असतात सर्वसामान्य जनतेचे कोणतेही काम असो ते करतात गोरगरिबाचे पंचायत समितीचे किंवा तहसीलचे काही रखडलेले काम असो ते नेहमी प्रामाणिक पणे काम करण्याचा प्रयत्न करतात तसेच महिलांना दवाखान्यामध्ये खूप अडीअडचणी येतात तेव्हा देखील ते स्वतः तिथे जाऊन त्यांचे प्रश्न सोडवतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी समाज सेवा व गोरगरिबांचे असेच काम करत राहील असे राष्ट्रवादी काँग्रेस चे पाटोदा तालुका उपाध्यक्ष अंजूम सय्यद यांनी सांगितले आहे.
