शाखा व्यवस्थापकास उपस्थित करावे व शेतकर्यावरिल खोटे गुन्हे मागे घ्यान्याची गावकऱ्यांची मागणी

Beed

शाखा व्यवस्थापकास उपस्थित करावे व शेतकर्यावरिल खोटे गुन्हे मागे घ्यान्याची गावकऱ्यांची मागणी

अन्यथा बँके समोर उपोषण करण्याचा इशारा

 

 

जालना जिल्हा/वार्ताहर 

भागवत गावंडे अंबड तालुक्यातील जामखेड येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना या बँक शाखा व्यवस्थापक उपस्थित नसल्याबाबत गावकऱ्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया  जालना जिल्हा उपनिबंधक व नायब तहसीलदार अंबड यांना निवेदन देऊन बँक व्यवस्थापक उपस्थित राहण्याबाबत निवेदन दिले.
याविषयी अधिक माहिती अशी की सदरील निवेदन हे जामखेड परिसरातील रहिवासी बँकेचे ग्राहक आहेत काही दिवसापासून बँक व्यवस्थापकाच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. तसेच पिकासाठी केलेल्या फाईल साठी दोन-तीन महिन्यापासून चकरा मारत असुन तरी होत नाहीत व शेतकऱ्यांची माफी आलेली असून त्यांच्याकडून वरील अतिरिक्त व्याज शेतकऱ्याकडून घेत आहे कर्जाच्या फाईल साठी कमीत कमी कमी चौदा प्रकारचे कागदपत्रे तालुक्याच्या ठिकाणाहून जमा करावे लागतात त्यासाठी कमीत कमी शेतकऱ्यांना आठ दिवस लागतात त्यामुळे शेतकर्याची आर्थिक नुकसानिसह वेळ वायि जावून देखील फाईल होत नसलेल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शाखा व्यवस्थापक यांना विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करतात व शाखा व्यवस्थापक शेतकऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल करून , बँक स्थलांतर करण्याची धमकी शेतकऱ्यांना दिली जात आहे त्यामुळे अशा शाखा व्यवस्थापकाची चौकशी करून शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे नसता आम्ही सर्व शेतकरी शाखेसमोर उपोषण करू अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  तरी माननीय मान्यवर साहेबांनी गांभिर्याने दखल व विचार करून बँक स्थलांतर थांबवावे असे निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर पंकज मंडलिक , गणेश भोजने ,  बबन मस्के , सुभाष मोरे , विलास भोजने , एकनाथ दिवटे , भीमराव पवार , गोरखनाथ जाधव , परमेश्वर पागिरे , अण्णासाहेब जाधव , प्रदीप पवार , इब्राहीम कुरेशी , नाथा भोजने , आर.आर. वैद्य , शंकर धुळे , सांडू लेंभे , जोलाल जाधव , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, मंडळ अधिकारी सरपंच व युनियन बँक वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter