८८ भिमा कोरेगांव दंगलीमध्ये पोलिस उपअधिक्षक यांच्या वाहनावर दगडफेक करुन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातुन आरोपींची निर्दोष मुक्तता-अॅड.अविनाश पं.गंडले

८८ भिमा कोरेगांव दंगलीमध्ये पोलिस उपअधिक्षक यांच्या वाहनावर दगडफेक करुन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातुन आरोपींची निर्दोष मुक्तता-अॅड.अविनाश पं.गंडले
बीड/परवेज खान
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की , दिनांक 02/01/2018 रोजी 12 ते 12.30 वाजणेच्या सुमारास मा.जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांनी कार्यालय आदेश क्रमांक 2017 / आर.बी.डेस्क -1 / पोल -1 / डिसेंबर 2017 महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) प्रमाणे लागु केलेले मनाई आदेशाचे उल्लंघन केले व पोलिसांचे शासकीय वाहन ( जिप ) क्रमांक MH.23.AF.0120 चे नुकसान केले व पोलिस पेट्रोलिंग करत असतांना बुध्द विहार माळीवेस बीड कडुन मोटारसायकलवर आलेल्या तरुणांनी पोलिस वाहनाच्या पाठीमागच्या बाजुने दगडफेक केली व वाहनाचे व सरकारी मालमत्तेचे नुकसान केले व सरकारी कामकाजात अडथळा आणला म्हणुन गु.र.नं .5 / 2018 कलम 353 , 336 , 34 भा.दं.वि. व कलम 3 सरकारी मालमत्ता नुकसान कायदा 1984 हा 1 ) किरण शिंदे , 2 ) प्रेम तांगडे , 3 ) राहुल शिनगारे , 4 ) अभिजित निकाळजे , 4 ) ऋषिकेश सवाई , 5 ) अजिंक्य पवळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले , सदरील प्रकरणात सरकार पक्षाकडुन चार साक्षीदार तपासण्यात आले . या प्रकरणात मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड श्री एच.एस. महाजन साहेबांनी दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकुन आरोपींची कलम 353 , 336 , 143 , 147 , 149 भा.दं.वि. व कलम 3 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 या आरोपातुन आरोपींची निर्दोष मुक्तता केली . या प्रकरणात सर्व आरोपींकडुन अॅड.अविनाश पं.गंडले यांनी काम पाहिले त्यांना अॅड . ईम्रान पटेल , अॅड.बप्पा माने , अॅड.किरण मस्के , अॅड.सुरक्षा वडमारे , अॅड.गोवर्धन पायाळ , अॅड.रईस पठाण , अॅड.तेजेष नेहरकर यांनी सहकार्य केले .
