नवीन दरवाढीच्या करारा शिवाय मजूर ऊस तोडणी ला जाणार नाही यासाठी धारूर येथे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मुकदम व मालक व ऊसतोड कामगार यांनी उपस्थित राहावे_ इंजिनीयर सादिक इनामदार

किल्ले धारूर/वार्ताहार
राज्यातील ऊस तोडणी मजूर वाहतूकदार आणि मुकदम संघटनाचा करार संपला आहे नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केली आहे त्यामुळे माजी मंत्री तथा तीन जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाही
ऊस तोड मजूर मुकदम व वाहतूकदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊस तोडणी मधून संघटनेने पुकारलेल संप दरवाढीच्या नवीन कारण मान्य होईपर्यंत ऊस तोडणी न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे ऊस तोडणी वाहतूक दारात वाढ करावी मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी सर्व कारखान्यात शौचालयाची सुविधा असल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये व बैलांचा संपूर्ण विमा कारखान्याने उतरावा या सर्व मागण्या साठी किल्ले धारूर शहरामध्ये दिनांक2/10/2020 रोजी सकाळी बारा वाजता शासकीय विश्रामगृह किल्ले धारूर येथे बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान इंजिनीयर सादिक इनामदार यांनी केली आहे