तलवाडा येथे " यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक " यांच्या अभ्यासकेंद्रास मान्यता

Beed

तलवाडा येथे " यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक " यांच्या अभ्यासकेंद्रास मान्यता

"  अध्यक्ष सुरेश हात्ते यांच्या प्रयत्नाना यश"

तलवाडा/वार्ताहर 

 तलवाड्यामध्ये छत्रपती सेवाभावी संस्था संचलित , त्वरितापुरी कला व विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून यापुर्वीच ग्रामिण भागातिल विद्यार्थांना पदवी पर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता याच महाविद्यालया अर्तगत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक यांच्या अभ्यासकेंद्रास मान्यता मिळाली आहे. 
बीड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील हे एकमेव अभ्यासकेंद्र आहे. यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनाही ईतर व्यावसाय किंवा नौकरी करत असतांना पदवी पर्यंत शिक्षण घेणे शक्य होणार आहे.
या अभ्यासकेंद्रातील पुर्वतयारी अभ्यासक्रमानुसार १०वी , १२ वी नापास झालेल्या किंवा १२वी पर्यंत शिक्षण घेवु नशकलेल्या विद्यार्थ्यांनाही बी.ए. पदवी शिक्षण घेता येईल.
छत्रपती सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष मा. सुरेशरावहात्ते साहेबांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना हि संधी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व स्थरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

Sharing

Visitor Counter