शहरात पूर्णवेळ फळे व भाजीपाला फिरून विक्री परवाना दिला जाणार-राहुल रेखावर

(बीड प्रसार न्युज) बीड जिल्ह्यात कलम १४४ आदेश लागू करण्यात आलेला आहे संचार बंदी अंतर्गत शितील करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करीता बीड शहरातील विविध ठिकाणी नगरपरिषद मार्फत ठिकाणी निश्चित करण्यात आलेली असून सदर ठिकाणी भाजीपाला विक्री होत आहे.परंतु कोरोना या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधक उपाय योजना करणे गरजेचे आहे. यामध्ये खरेदी किंवा विक्री करताना योग्य ते सामाजिक अंतर ठेवावे एकच रांग करून उभे राहून भाजीपाला खरेदी करावा असे अपेक्षित आहे.परंतु संचारबंदी अंतर्गत शिथिल करण्यात आलेल्या कालावधीत जीवनावश्यक फळे व भाजीपाला यांचे खरेदी व विक्री करिता नागरिकांची गर्दी होत असल्याचे आढळून येत आहे.
त्याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ची संकल्पना राबवत फळे व भाजीपाला यांचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता शेतकरी उत्पादन/शेतकरी संघ/शेतकरी गट यांना शहरात घरोघरी फिरून भाजीपाला व फळे विक्री करावयाची असल्यास त्यांनी विभागांतर्गत कार्यरत,कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक,तालुका तंत्रज्ञान?व्यवस्थापक (बी टी एम ),सहाय्यक तंत्रज्ञान,व्यवस्थापक (एटीएम)मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, यांच्याकडे आपले कडील उपलब्ध फळे-भाजीपाला शेतीमाल याची नोंद करावी नोंदणी नुसार सदरगट यांना फळे व भाजीपाला विक्रीचा परवाना व वाहन परवाना तालुकास्तरावर दिला जाईल. सदर शेतकरी गट/शेतकरी उत्पादक/कंपनी/शेतकरी संघ यांना दिलेल्या प्रमाणानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नेमून दिलेल्या ठिकाणी विभागात फिरून भाजीपाला विक्री करावा लागेल. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व सामाजिक अंतर राखून भाजीपाला विक्री केली जाईल याची जबाबदारी त्या गटाची राहील तसेच विक्री वेळी संबंधितास तोंडाला मास्क वापरणे व हाताला ग्लोज घालने सेनिटयजर चा वापर करणे बंधनकारक राहिल.
याकरिता तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली समित्या तयार करण्यात आलेली असून सदर समितीमार्फत शेतकरी उत्पादक/कंपनी/शेतकरी संघ/शेतकरी गट यांना परवाने देणे फळे व भाजीपाला विक्री चे ठिकाण विभाग निश्चित करून देणे तसेच दररोज संध्याकाळी विक्री करावयाचे फळे व भाजीपाल्याचे दुसऱ्या दिवशी साठी चे दर निश्चित करून देण्याची कारवाई करण्यात येईल.यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता येईल याचा लाभ शेतकऱ्यांना होईल तसेच यामुळे होणारी नागरिकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल.
फळे व भाजीपाला विक्री करताना तालुका स्तरावर समिती ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अधिक दराने विक्री करता येणार नाही तसेच त्यांना रोजचा बाजार भाव दर्शविणारा फलक त्यांची विक्री वाहनावर लावणे बंधनकारक आहे.
