बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या कोवीड - 19 च्या काळामध्ये सँनिटायझर फवारणी
Beed

बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या कोवीड - 19 च्या काळामध्ये सँनिटायझर फवारणी
बीड/प्रतिनिधी
बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या कोवीड - 19 च्या काळामध्ये सँनिटायझर फवारणीचे काम प्रशासनाच्या सुचनेनुसार जिथे गरज असेल तिथे सुरू आहेच,अग्निशामक यंञणेमार्फत देखील फवारणीचे काम चालू आहे. माञ काही ठिकाणी लहान जागा असल्या कारणाने मोठी गाडी जात नाही ही अडचण लक्षात घेऊन नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी सबंधित यंञणेला सुचना करून छोटे वाहन यासाठी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या जेणेकरुन फवारणीसाठी अडचणी येणार नाहीत.
आज ही छोटी वाहने उपलब्ध झाले असुन ते 3000 लिटर क्षमतेचे आहे,10 ते 15 फुट छोट्या भागात जाण्याची याची क्षमता आहे, निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.