काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक बॅनर मधून माजी आमदाराचा फोटो गायब !

Beed

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक बॅनर मधून माजी आमदाराचा फोटो गायब !

बीड प्रतिनिधी

लोकसभा प्रभारी अमित देशमुख यांची आज शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे काँग्रेसच्या पदाधिकारी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती, अमित देशमुख हे प्रथमच लोकसभा प्रभारी नियुक्त झाल्यानंतर बीडमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत आले होते यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बीड शहरात विविध भागात त्यांच्या निमंत्रणाचे मोठे बॅनर लावले होते, या निमंत्रण बॅनर मधून बीड मधील एका माजी आमदाराचे फोटो गायब करण्यात आले, वरिष्ठ पातळीवरचे सर्व पदाधिकाऱ्यांचा फोटो बॅनर मधून झळकत आहे मात्र माजी आमदार व काँग्रेसचे निष्ठावंत असलेले एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला बॅनर मधून डावलण्यात आले असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधून चर्चेला उधान आले आहे, जिल्ह्यात काँग्रेस नवीन उभारी घेत असताना काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुस फुस समोर येत आहे .

Sharing