बीड तालुक्यातील शेताचे जयदत्त क्षीरसागर यांनी पीक नुकसानीची केली पाहणी

बीड तालुक्यातील शेताचे जयदत्त क्षीरसागर यांनी पीक नुकसानीची केली पाहणी
बीड/वार्ताहर
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे सरसकट नुकसान भरपाई दयावी, पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. कापूस, तूर व बाजरी ही पिके सडून गेली आहेत. उसाचे पीक ही वादळी वाऱ्याने झोपले आहे.
शेतकरी उद्भवस्थ झाला आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या तातडीच्या मदतीची गरज आहे. शेती व माती साठी आता कटिबद्ध राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव न करता मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. सरकार हे मायबाप आहे, शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे आहे त्यासाठी सरकारने तो विश्वास सार्थ करून दाखविला पाहिजे.
