नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार!दसऱ्याच्या सणामध्ये झाली नागरिकांची पाण्यासाठी धावपळ

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार!दसऱ्याच्या सणामध्ये झाली नागरिकांची पाण्यासाठी धावपळ
किल्ले धारूर /प्रतिनिधी
सणांमध्ये दहा दिवसापासून सोडले नाही पाणी किल्ले धारूर शहरामध्ये नगर परिषदे मार्फत जो पाणीपुरवठा होतो त्यावर ना कुणाचा अंकुश ना कुणाचा दाब राहिलेला दिसत नाही वारंवार मुख्याधिकारी नितीन बागूल यांना सांगूनही 10 दिवस पाणी सुटत नाही यामुळे कर्मचाऱ्यावर अंकुश राहिलेला दिसत नाही या मनमानी कारभाराला नागरिक वैतागून गेले आहेत
धारूर शहरातील कसबा विभागातील केज रोड भागात आठ ते दहा दिवसापासून पाणी सोडण्यात आले नाही दसऱ्याच्या सणांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली आहे अगोदर पाईपलाईन फुटीचे कारण सांगून उडवाउडवी चे उत्तर देण्यात आले मुख्याधिकारी यांना सांगितल्यानंतर पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली पण पाईपलाईन दुरुस्ती करूनही पाणी सोडण्यात आले नाही
शहरांमध्ये स्वच्छता चे ही असे खुप प्रश्न मार्गी लागत नाहीत यामुळे शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले आहे व रोगराई ही पसरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अशी चर्चा मुख्याधिकारी चे कर्मचारी ऐकत नाहीत असेच म्हणावे लागत आहे अशा या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे
