सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक विश्राम गृह अंबड येथे संपन्न

सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक विश्राम गृह अंबड येथे संपन्न
अंबड /प्रतिनिधी भागवत गावंडे
शासकीय विश्रामगृह अंबड येथे ज्येष्ठ समाजसेवक तथा पद्मविभूषण मा. अण्णा हजारे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या सदस्यांच्या वतीने घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी विषयी सहविचार बैठक घेण्यात आली. गावाच्या विकासात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी दिलेला लढा, केलेल्या प्रयत्नां विषयी माहिती घेण्यात आली. भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करुन ही दोषींवर कारवाई करण्यात येत नाही असे निदर्शनास आले आहे. एकूण चोवीस लोकांची उपस्थिती होती त्यामध्ये पूर्ण कागदपत्रे असलेल्या ग्रामपंचायत कडून झालेल्या बोगस कामे तसेच लाभार्थ्यांना राशन देतांना दुकानदारांची मनमानी कारभार अशा प्रकारच्या सहा प्रकरणा मध्ये कारवाई करून न्याय देणे बाबत निवेदन तयार करून मा. उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या कार्यालयीन कर्मचारी श्री अनंत चाटे व श्री विष्णू येवले यांची भेट घेऊन न्याय देण्या बाबत निवेदन सादर करण्यात आले.
बैठकीत दिनकर उघडे, गजानन मुळे, प्रल्हाद दहिभाते, लक्ष्मण बोंबले, अर्जुन भुक्कन, दत्ता मसुरे, उद्धव दहिभाते, बबन सोनवणे, चंद्रकांत मुळे, गणेश मंडपे, भागवत गावंडे आणि देवानंद चित्राल यांची प्रमुख उपस्थिती होती.
