LIC ऑफीस मध्ये आग,लाखो रूपये चे कागदपत्रे जळुन खाक!
Beed

LIC ऑफीस मध्ये आग,लाखो रूपये चे कागदपत्रे जळुन खाक!
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील नगर टोडवरील असलेल्या एलआयसी विभागाच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याची घटना घडली . या आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत . सुदैवाने जीवित हानी झालेली नसल्याचे एलआयसी शाखाधिकाटी परदेशी यांनी सांगितले . बीड शहरातील नगर रोड भागात एलआयसीचे दोन मजली मुख्य कार्यालय आहे . या कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत . ही आग कशामुळे लागली , हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रामप्रसाद राऊत यांनी सांगितले . आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे जवान पहाटे साडेतीन वाजेपासून प्रयत्न करत आहेत . गेवराई येथील अग्निशमन विभागाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे .
