पोलिस कर्मचार्यंची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला

Beed

बीड/प्रतिनिधी 
आमदार संदीप भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली व सलीम अध्यक्ष युवा मंचच्या वतीने  छोटासा उपक्रम राबविला.

कोरोना सारख्या आपत्तीला पोलिस प्रशासन रात्रंदिवस आपला कर्तव्य बजावताना दिसत आहेत.पोलीस अधिकारी देखील माणूसच असतो त्याला देखील कुटूंब असतो व तोहि एक  कुंठूब प्रमुख असतो आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपले कुटुंब बाजुला ठेवून आज पोलिस कर्मचारी २४ आपल्या सेवेत स्वतःची काळजी न करता सज्ज उभी आहेत.

आज या ठीकाणी बीड पोलिसांची मुख्य भूमिका आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु कोरोनाशी लढण्यासाठी पोलिस प्रशासनाने जे कठोर निर्णय घेतलेले आहे त्यात त्यांना यश देखील  मिळाताना दिसत आहे.

आज पोलिस प्रशासनाचे मनोबळ वाडवण्यासाठी आमदार संदीप भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली व सलीम अध्यक्ष युवा मंचच्या वतीने  छोटासा उपक्रम राबविण्यात आलं.

या ठीकाणी ऑन-डियूटी पोलीस कर्मचार्यंना नाश्ता व फ्रुट्स जागोजागी डॉ.बाबासाहेब अंबेडकर पुतळा,सुभाषरोड,साठे चौक,बशीरगंज,नगरनाका,बार्शीनाका,शिवाजीनगर,बालेपिर,जालना रोड,माळीवेस चौक,पेठबिड,बलभीम चौक इत्यादी भागात जाऊन वाटप करण्यात आले व त्यांचा मनोबळ वाढवायला  त्यांचे आभारव्यक्त केले.

Sharing

Visitor Counter