बालदिन आणि विधी सेवा सप्ताह निमीत्ताने बाल न्याय मंडळ बीड येथे दिवाळीसाठी नवीन कपडे, खाऊ व इतर वस्तू वाटप

Beed

बालदिन आणि विधी सेवा सप्ताह निमीत्ताने बाल न्याय मंडळ बीड येथे  दिवाळीसाठी नवीन कपडे, खाऊ व इतर वस्तू वाटप

प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश हेमंत शं. महाजन यांच्या उपस्थितीत उपक्रम  संपन्न

बीड/प्रतिनिधी 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड कार्यालयातर्फे विधी सेवा सप्ताह व बालदिन  निमीत्ताने बाल न्याय मंडळ बीड येथील मुलांना बीड मुख्यालयातील न्यायाधीश यांच्या सहभागातून दिवाळी साठी  नवीन कपडे व खाऊ व इतर वस्तू वाटप करून (दि. १४ रोजी) साजरा करण्यात आला.

जिल्ह्यातील रिमांड होममधील बालक  तसेच वृद्धाश्रमातील  ज्येष्ठ लोकांसाठी  चांगली दिवाळी व्हावी यासाठी पुढाकार घेऊन निधी जमवला व अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड हेमंत शं. महाजन यांनी "लक्ष दिव्यांच्या रोषणाईत आणखीन एक दिवा लावण्यापेक्षा तोच दिवा गरिबांच्या झोपडीत लावला  तर त्यांची दिवाळी आनंदात होईल" अशा भावना व्यक्त केल्या. 

या कार्यक्रमास यु. टी. पोळ जिल्हा न्यायाधीश बीड, एम. व्ही. फडे मुख्यन्यायदंडाधिकारी ,  एस. एन. गोडबोले प्रभारी सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व श्रीमती व्ही. ए. देसाई  उपस्थित होत्या.

Sharing

Visitor Counter