मिलिया प्रायमरि शाळेच्या शिक्षाकडुन विद्यार्थ्यांना किट वाटप!

Beed

(बीड प्रसार न्युज)

आज कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीचा आपण सामना करत आहोत परंतु आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गल्लीत,भागात, शहरात, जिल्ह्यात कितीतरी लोकांचे हाल होताना दिसत आहे परंतु याठिकाणी लोकांचे खूप हाल होण्याअगोदरच शासनाने अन्नपुरवठा लोकांना केला आहे. त्याचा शंभर टक्के लोकांना फायदा होताना दिसत आहे परंतु या  ठिकाणी कितीतरी लोक अजून ते अन्नधान्य पासून वंचित आहेत.

याठिकाणी प्रशासन अधिकारी या आपत्तीला लढताना दिसत आहे आपण हे वाक्य सहज बोलतोय कि, आपत्तीचा सामना पोलीस,डॉक्टर,पत्रकार हे करत आहेत हे अगदी बरोबर आहे परंतु याठिकाणी स्कूल चे शिक्षक सुधा कमी नाही हे मिलिया प्रायमरि स्कूल गांधी नगर चे दाखवुन दिले.या भागातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकाकडुन किट वाटप करण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्याला गहू,तांदूळ,शेंगदाणे,साखर,मसूर दाळ,उडीद दाळ अशी एक किट तयार करून प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आली.

गांधीनगर भागात जास्तकरून गरिब लोक राहतात व  मजूर लोक आहेत अशा लोकांच्या मुलांना या ठीकाणी किट  देण्यात आली तर मुलांबरोबर आलेल्या पालकांनी शिक्षक वर्गाला पोट भरून आशीर्वाद दिला व त्यांचे आभार व्यक्त केले. 

तसेच फक्त गांधीनगरच नव्हे तर बालेपीर भागात सुद्धा मिलिया प्रायमरी शाळेची एक शाखा आहे त्याठिकाणी देखील प्रत्येक विद्यार्थ्यांना किट वाटप करण्यात आली.तसेच मिलिया प्रायमरि शाळा किला मैदानच्या ठिकाणीदेखील किट वाटप करण्यात आली अशा एकून मिलिया प्रायमरि शाळेच्या शिक्षक वर्गाकडुन एकुन ७५०किट वाटप करण्यात आले. 

प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनी अशी भूमिका पार पाडली तर नक्कीच एकही व्यक्ती किंवा एकही कुटुंब उपाशी राहणार नाही व आशीर्वाद दिल्याशिवाय देखील राहणार नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये लोकांच्या कामाला या व आपल्याकडून "फुल ना फुलाची पाकळी" द्या.

Sharing

Visitor Counter