पतीने पत्नीस डिझेल टाकून पेटविले

किल्लेधारूर/इरफान शेख
धारूर शहरातील वडारवाडा वस्तीत मुलीला नांदवण्यास पाठविण्या वरून पती-पत्नीत वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की पतीने पत्नीस डिझेल टाकून पेटवून दिले. मृत्यूपूर्व फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पतीवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धारूर शहरातील वडारवाडी भागात मुलीला नांदविण्यास पाठवल्या वरून पती-पत्नीत वाद झाला यावरून पती दशरथ रामा धोतरे याने फिर्यादी पत्नी शांताबाई धोत्रे वय ३५ चपलने मारहाण करून तू मेल्या शिवाय माझे चांगले होणार नाही तू मारून जा, म्हणत फिर्यादी पत्नीच्या अंगावर घरातच असलेल्या पाच लिटर डिझल डबा उचलून पेटवून दिले यात शांताबाई या चांगल्याच भाजल्या आहेत.
धारूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम ऊपचार करून पुढील उपचारासाठी त्या महिलेस अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठविण्यात आले पीडित महिलेने दिलेल्या जवाबा वरून आरोपी पती रामा धोतरे याच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ३०७,३२३ गुन्हे अंत्रगत धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.
