नगर परिषद घन कचर्‍या मूळे केसापूरी येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात

Beed

नगर परिषद घन कचर्‍या मूळे केसापूरी येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात

माजलगांव/प्रतिनिधी

शहरातील नगरपरिषद अंतर्गत येणारे सर्व घनकचरा च्या डेपो म्हणून नगरपरिषद ने केसापूरी येथील जागा घेवून त्या ठिकाणी शहरातील घान टाकण्यात येते,आज तिथीला नगरपरिषद अंतर्गत स्वच्छता टेंडर करण्यात आले या वेळी स्वच्छता टेंडरवाल्यांनी चक्क कहरच केला की,डायरेक्ट अॅटो कचर्‍याचे कोठेपण टाकून जातात.व सर्व कचर्‍यांना आग लावली जाते .आगलावलेला कचर्‍यांचा धूर दूरव जाउन त्या घाणीने तेथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे असा गंभीर आरोप गाववाल्यांनी केला आहे.तसेच कोवीड सेंटर मधील घान सूध्दा त्या ठीकाणी टाकण्यात येते नियमानूसार तिथे वाॅचमन,रखवालदार असने गरजेचं असून स्वच्छता टेंडर चा ठेकेदार स्वमर्जी करत असून गावकर्‍यांनी सकाळपासून गाड्या अडवून ठेकेदाराचा व नगरपरिषदचा निषेध केला.जर नगरपरिषद व टेंडर ठेकेदारांनी व्यवस्थीत कचर्‍याची व्हलेवाट व टेंडर ठेकेदाराची मन मानीला चाप लावला नाही तर गावकर्‍यांच्या वतिने नगरपरिषद वर मोर्चा काडण्यात येईल असा देखील सरपंच व गावकर्‍यांनि इशारा दिलाआहे.

लाखो रू खर्च करून टेंडर घेतले पण त्याची निगा व्यवस्थीत नाही—आरेफ खैरूल्ला खान
 केसापूरी येथील नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देवून ही त्या निवेदनाला केराची टोपली समजणार्‍या ठेकेदारावर शास्ती आणी शीस्ती भंगाची कार्यवाही कराय हरकत ? लाखो रु,उधळपट्टी कचर्‍या पासून खत निर्मीत करण्याचा मानस असून कसल्याच प्रकारची मशीनरिज त्या ठिकाणि उपलब्ध नसून खत निर्मीती नूसती नावालाच का?टेंडर च्या ठेकेदाराने त्या ठिकाणी कमीत कमी सहा ते सात मजूर लावने बंधनकारक आहे .पण हा अवीर्भाव ठेकेदाराला जमत नसेल तर आम्हाला रितसर तक्रार करावी लागेल असे मत दक्षता समीतीची सदस्य आरेफ खैरूल्ला खान यांनी मांडले आहे.

Sharing

Visitor Counter