वीज बिलासाठी सक्ती करणार महावितरण सेवा देताना मात्र बेफिकीर, ग्रामस्थांनाच जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावे लागतात --डॉक्टर गणेश ढवळे

वीज बिलासाठी सक्ती करणार महावितरण सेवा देताना मात्र बेफिकीर, ग्रामस्थांनाच जीव धोक्यात घालून फ्यूज टाकावे लागतात --डॉक्टर गणेश ढवळे
बीड (रिपोर्टर-गोरख मोरे )
ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सध्या पावसामुळे जमिनीत ओल असल्याकारणाने कोणत्याही विद्युत उपकरणा शिवाय फ्यूज
टाकने जिकरीचे झाले असून जीव धोक्यात घालून ग्रामस्थ फ्यूज टाकतात . महावितरणचे कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यातून बंदिस्त नसलेले ट्रांसफार्मर जनावरांसाठी देखील धोकादायक आहेत, मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करताना दिसून येते .
अण्णाभाऊ साठे नगर लिंबागणेश ता. जी. बीड.... दररोज रात्री लाईट जाते, वस्तीतील मुलं लाकडी काठी घेऊन हातानेच फ्यूज टाकण्याचा प्रयत्न करतात, हातात ग्लोज विद्युत रोधक नसतात, जीव मुठीत घेऊन फ्यूज टाकतात .
मला फोन केला, मी वस्तुस्थिती पाहण्यासाठी गेलो असता वरील प्रकार निदर्शनास आला, सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे ट्रान्स फार्मर भोवतालची जमीन ओली झाली आहे, त्यामुळेच विद्युत प्रवाह सुरू करताना जीवाला धोका होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे, लाईनमन शेळके यांना मी स्वतः फोनवरून विचारणा केली असता, फ्यूज टाकून लाईट चालू करतो म्हणाले...... ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी ट्रान्स फार्मर सताड उघडे असतात, बंदिस्त दरवाजे नसतात, पाऊस पडल्यामुळे आसपास उगवलेल्या गवताना चारण्यासाठी आलेल्या जनावरांचा ही जीव धोक्यात असतो.
सक्तीने वीज बिल वसूल करणारे महावितरणचे कर्मचारी सेवा कधी देणार---डॉक्टर ढवळे
मध्यंतरी वीजबिल रजा कारी पद्धतीने वसूल करणारे महावितरणचे कर्मचारी ग्रामस्थांना सेवा देताना तत्पर वाटत नाहीत, विज बिल भरल्या शिवाय तोडलेली वीज जोडणी करणार नाही म्हणणारे मात्र सेवा देताना फारशे तत्पर दिसून येत नाहीत, बहुतेककरून महावितरणचे कर्मचारी विशेषता लाईनमन मुख्यालयी राहतच नाहीत .
