सकारात्मक विचारामुळे 'इंदूबाई खामकर यांनी' 32 दिवस संघर्ष करून केली कोरोनावर मात

Beed

सकारात्मक विचारामुळे 'इंदूबाई खामकर यांनी' 32 दिवस संघर्ष करून केली कोरोनावर मात

सिटी स्कोर २५ ऑक्सिजन लेवल ४५ असून सुद्धा केली मात

किल्लेधारुर/प्रतिनिधी

राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याचे दिसून आले पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत मुत्यु दर जास्त असल्याने भीतीचे वातावरण बळावले,व्हेन्टीलेटर व प्राणवायू लागला म्हणजे मृत्यू असा गैरसमज वाढला आहे.परंतु मृत्यूच्या तोंडात जाऊन परतलेल्यांची संख्या ही जास्त आहे.सिटी सकॅन स्कोर २५ ऑक्सीजन लेवल 45 'तरी बरे होऊन घरी जायचेच' असा निर्धार करत डॉ देत असलेल्या ट्रीटमेंट ला प्रतिसाद देत तब्बल ३२ दिवसांनी बरे होऊन धारूर ची हिरकणी परतली..

मार्च महिन्याच्या सुरुवाती पासूनच राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला यात कोणाला बेड मिळाले कोणाला व्हेंटलेटर नाही मिळाले तर कोण हॉस्पिटल शोधत होते तर कोण हॉस्पिटलमध्ये जाण्यास उशीर झाला अश्या अनेक गोष्टी या काळात घडत गेल्या.

एप्रिल महिन्यात या अडचणींसोबत रेमडिसिव्हर इंजेक्शन व प्राणवायू चा तुटवडा काही रुग्णासाठी जीव घेना ठरला यात मोठ्या प्रमाणात वृध्दांचा समावेश होता.व्हेंटलेटर वर गेलेला रुग्ण परत येऊ शत नाही असा गैरसमज वाढत गेला मात्र किल्ले धारूर शहरातील मठ गल्ली येथील इंदूबाई रामचंद्र खामकर वय(५२) ११ मे रोजी किल्ले धारूर कोविड सेंटर मध्ये दाखल झाल्या काही दिवसांनी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना धारूर येथे प्राणवायू उपलब्ध नसल्याने लोखंडी (अंबेजोगाई) येथे पाठवण्यात आले मात्र तिथे ही त्यांची जास्तच प्रकृती चिंताजनक झाल्याने लोखंडी वरून स्वामी रामानंद तीर्थ वैधाकिय महाविद्यालय अंबेजोगाई येथे पाठवण्यात आले,तिथे त्यांचा छातीचा सिटी सकॅन करण्यात आला यावेळी २५ पैकी २५ स्कोर आला यात १०० फुफुस काम करण्यास निकामी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आले, तिथून पुढे झाली जगण्याची शर्यत सुरू झाली. २५ तारखे पासून ते २ जून पर्यंत व्हेंटलेटर लावण्यात आले शरीराची साथ व डॉ ची तत्परता कामी येत दि २ जून रोजी त्यांचा व्हेंटलेटर काढण्यात आला व १२ जून रोजी त्यांची कोरोनाचा लढा यशस्वी होत डिस्चार्ज मिळाला.
रुग्णालयात उपचार घेताना त्यांची मुलगी व मुलगा सोबत होता त्याच्यासह डॉ एकनाथ शेळके फिजिशियन डॉ भूषण जोगदंड,अक्षय अंबेकर,डॉ सुमित कदम,डॉ रोहिणी मुंडे,नर्स खरात यांच्यासह सकाळ वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख यांनी सकारात्मक मानसिकता वाढवली त्यामुळेच कोरोनावर मात करण्याससाठी बळ मिळाल्याचे शी बोलताना सांगितले.

Sharing

Visitor Counter