गोवा बनावटीच्या अवैद्य मद्य वाहतुकी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाची मोठी कारवाई

Beed

गोवा बनावटीच्या अवैद्य मद्य वाहतुकी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाची मोठी कारवाईगोवा बनावटीच्या

अवैद्य मद्य वाहतुकी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाची मोठी कारवाई

बीड प्रतिनिधी

गोवा बनावटीच्या अवैद्य मद्य वाहतुकी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क, बीड विभागाने मोठी कारवाई केली. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त खबरीच्या मदतीने आज दि.११/०१/२०२४ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे बीड सोलापूर हायवे वरील मौजे चौसाळा गावच्या हद्दीत एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ जिचा नोंदणी क्र.एम एच ४२ के ३६३५ या वाहनाची मिळालेल्या माहितीच्या आधारे झडती घेतली असता सदरील वाहनामध्ये गोवा राज्य बनावटीचा व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य मिळून आले.

या ठिकाणी अनुक्रमे ११७० X २००० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या रॉयल स्टंग व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या ज्याची अं.कि.रु.१२९५००/- २)१० X २००० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या ज्याची अं.किं.रु. १५५००/- ३)४८५ X ७५० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या सीलबंद वाटल्या ज्याची अं.कि.रु.२९१०००/- ४) एक जुनी वापराची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ जिचा नोंदणी क्र.एम एच ४२ के ३६३५ ज्याची कि.रु.६०००००/- असा एकूण १०३६०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. व सदरील गुन्ह्यातील आरोपी सुरेश उत्तम गोपाळघरे व इतर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही बीडच्या राज्य उत्पादन शुल्काव्दारे करण्यात आली आहे. यामध्ये प्र. निरीक्षक अभय अ. औटे, निरीक्षक आर.बी.राठोड, निरीक्षक श्री. गणेश गुरव, अंबाजोगाई , उप निरीक्षक व्ही. डी. आगळे, उप निरीक्षक रशीद बागवान, उप निरीक्षक अनंता नायाबळ, स.दु.नि. जवान सादिक सय्यद, सर्वश्री बी.के. पाटील. एस.व्ही.धस, एस.ए. सांगुळे, नितीन मोरे, राम गोणारे, प्रशांत मस्के, रूपसिंग जारवाल, कैलास जारवाल, शहाजी लोमटे, सुशील ढोले, के.एन. डुकरे यांनी उपरोक्त कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक विजयकुमार आगळे राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक बीड हे करत आहेत.

Sharing