कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसिलदार वमनेंना पदावरुन कार्यमुक्त करा नसता 15 ऑगस्ट दिवशी संजय गांधी निराधार समितीचा अमरण उपोषण

Beed

कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसिलदार वमनेंना पदावरुन कार्यमुक्त करा नसता 15 ऑगस्ट दिवशी संजय गांधी निराधार समितीचा अमरण उपोषण 

बीड/वार्ताहर 

कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसिलदार वामनेंना पदावरुन कार्यमुक्त करा नसता 15 ऑगस्ट दिवशी संजय गांधी निराधार समितीचा अमरण उपोषण करण्यात येईल असा निवेदनातून करण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की,तहसिलदार यांनी यापूर्वी संजय गांधी निराधार समितीची बैठक दि .4 / 6 / 2021 रोजी झाली होती . काल महिन्यानंतर तहसिलदार वमने यांनी जवळपास 5 हजार फाइलमधून फक्त 67 फाईल मंजूर केल्या आहेत . संबंधीत तहसिलदार हे हेतुपरस्पर कोणता तरी राग , व्देष मनात ठेवून वंचित निराधार , अपंग , विधवा , परितक्त्या यांना वंचितच ठेवत आहे . समितीने त्यांना विचारणा केली असता उडवा - उडवीचे उत्तर त्यांनी दिले . पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 2020-21 मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र दाखल करण्यास सूट दिली तसा जि.आर. काढला पण संबंधीत तहसिलदार व अधिकारी यांनी तसा जि.आर.आम्हाला आला नाही . मुंडे साहेबांनी पेपरला जाहिर केले पण आमच्या पर्यंत तो आला नाही असे स्पष्टपणे ते खोटे बोलले तेव्हा समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर , अशफाक इनामदार , सुनिल महाकुंडे , विद्याताई जाधव , उत्तरेश्वर सोनवणे , सचिन शेळके . चौरंगनाथ पवार , उध्दव पैठणे , विक्रम सोनवणे यांनी तहसिलदारांना विचारपूस केली . तेव्हा त्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली . वंचित निराधार , अपंग , विधवा परितक्तया यांच्यावर ते अप्रत्यक्ष अन्यायाच करत आहेत . म्हणून येत्या 15 ऑगस्ट रोजी सर्व समितीचे सदस्य शहरी आणि ग्रामीण हे आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहोत . तहसिलदार वमने हे आमच्याशी मयुरपणे वागतात एका मिटींगला जर 67 फाईल होणार असतील तर सात हजार फाईल मंजूर व्हायला किती वर्ष लागतील ? तोपर्यंत अर्जदार जिवंत रहातील का ? त्यांना या योजनेचा लाभ मेल्यानंतर देणार का ? कुटुंब अर्थसहाय्यातील लोकांना एक महिन्यात लाभ मिळतो . मात्र फाईल मंजूरीनंतर एक - एक वर्ष झाले तरी पण तहसिलदार संबंधीताना लाभ का देत नाहीत ? असे अनेक गोरगरीब जनतेच्या निगडीत प्रश्नांची विचारपूस करत अध्यक्ष व समिती सदस्यांनी तहसिलदार व कर्मचाऱ्यांना विचारपूस केली तरी पण निगरगट तहसिलदार वमनेला धाम फुटला नाही . ते माझी काम करण्याची पध्दत अशीच आहे आपणास काय करायचे ते करुन घ्या मला काहीही फरक पडणार नाही अशी अडेलतटू भूमिका त्यांनी घेतली . त्यानंतर आम्ही पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब व आमदार संदिपभैय्या क्षिरसागर यांच्या समोर सोक्षमोक्ष होईपर्यंत आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे . . तसेच मा.साहेबांना विनंती की . बीड येथील तहसिलदाराला हटवा नसता आमचे सामुहिक राजीनामे पालकमंत्री , आमदार साहेबाकडे आम्ही देणार आहोत . तरी विनंती की , कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसिलदार वमर्नेना पदावरुन कार्यमुक्त करा व गोर गरीब , चित - निराधार , अपंग , विधवा व परितक्त्या , दुर्धर आजाराने पिडीत असणाऱ्या लाभधारकांना या योजनेतून लाभ मिळावा यासाठी आपल्या स्तरावरुन तहसिलदार यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना योग्य न्याय द्यावा ही विनंती . नसता आम्ही आपल्या कार्यालयासमोर 15 ऑगस्ट या दिवसापासून अमरण उपोषणास बसणार आहोत यांची दखल घ्यावी .

Sharing

Visitor Counter