गेल्या चार वर्षात झोपलेल्या नगरसेवकाला इलेक्शन पोटी जाग आली का?-नवीद इनामदार

गेल्या चार वर्षात झोपलेल्या नगरसेवकाला इलेक्शन पोटी जाग आली का?-नवीद इनामदार
बीड/वार्ताहर
बीड शहरातील जसे जसे निवडणूक जवळ येत आहेत तसे तसे नवीन चित्र पाहण्यासाठी भेटत आहे म्हणजेच गेल्या चार वर्षापासून सत्तेत असणारा नगरसेवक झोपेत होता की झोपेचे सोंग घेतले होते हेच प्रश्न निर्माण होत आहे.
चार वर्षांपासून वॉर्डाचा एकही विकास काम केला गेला नाही परंतु निवडणूक लक्षात घेत आता नगरसेवकाकडून स्टंटबाजी चालू झालेली पाहाणयास मिळत आहे.
वार्ड क्रमांक 21 मधील गेल्या चार वर्षापासून नगरसेवक का मार्फत कोणते काम झाले हे पाहणे आता खुप गरजेचे आहे तर का झाले नाही याची कारणे सुद्धा शोधायला हवी आहे.
अवघ्या चार महिन्याच्या इलेक्शन निवडणूक लक्षात घेत आता नगरपरिषद समोर उपोषण ला बसत आहेत तर हेच लोक गेल्या चार वर्षापासून मांडीला मांडी लावून सोबत बसत आहे किती दिवस अजून लोकांची दिशाभूल करणार? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे लोकांची दिशाभूल करू नका असे आव्हान नवीद इनामदार यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.