कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना सरसगट पास करा - शेख जुनेद,अंकुश गवळी

कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना सरसगट पास करा - शेख जुनेद,अंकुश गवळी
बीड/प्रतिनिधी
कोरोना सारख्या आजाराच्या कठीण प्रसंगी शासन व्यवस्थेला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. आज घडीला संपूर्ण जगभरात करोना ने थैमान मांडलेल असताना सर्वच घटकांवरती त्याचे परीणाम होताना दिसत आहे यांचा प्रत्यय विद्यार्थी वर्गाला आज आला शेवटच्या वर्षातील शेवटच्या सेमिस्टर मधील विद्यार्थी वगळता बाकी सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रोमोट करण्यात येणार आहे यामुळे सुमारे 24 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असल्याने कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्र्ण करण्याच्या या निर्णयाचे विद्यार्थी नेते शेख जुनेद यांनी स्वागत केले आहे मागच्या २५ ते ३० दिवसांपासुन काय होनार हा संभ्रम असताना वेळेवेळी त्यांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाशी पत्रव्यव्हार चालु होता अशातच आज सरकारणे निर्णय जाहीर केला.
असुन 1 जुलै ते 15 जुलै दरम्यानच शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचा परीक्षा होतील सुमारे 8 लाख विद्यार्थी साठी या परीक्षा असतील.
प्रोमोट केलेल्या विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टर च्या आधारे आणि या सेमिस्टर मधील कामाच्या आधारे पास करण्यात येईल ज्या विध्यार्थीची मागील विषय राहिलेले पेपर पुढील सेमिस्टर मध्ये 120 दिवसाच्या आत घेण्यात येईल व जे विद्यार्थी तरीसुद्धा नापास होतील ग्रेड मध्ये त्यांना सुद्धा पुढील वर्षात प्रोमोट करण्यात येईल तसेच त्याच्या राहिलेले विषय त्याच सेमिस्टर मध्ये विद्यापीठ द्वारे परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात येईल पुरेशा काळजी नुसार शेवटचे वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा घेण्यात येतील असेही सरकार कडुन सांगण्यात आले 45 दिवस लॉकडाउन चे हजेरी मध्ये धरून विद्यार्थ्यांना पास करण्यात येईल असा निर्णय आज झाला आहे ,तरीही दिवस भरत नसतील त्यांचा विचार सहानुभूतीने विद्यापीठाने करावा या निर्णयाचे स्वागत करत आहे आणी उर्वरीत विद्यार्थ्यांच्या परीक्षे बाबतही शासणाने विचारपुर्वक निर्णय करावा आम्ही महाराष्ट्र शासनासोबत आहोत अस देखील मत बलभीम महाविद्यालय बीड येथील विद्यार्थी शेख जुनेद,अंकुश गवळी, यांनी व्यक्त केले आहे.
