महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे बीड जिल्ह्य़ातील नागरीकांना कधी न्याय देणार??

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे बीड जिल्ह्य़ातील नागरीकांना कधी न्याय देणार??
बीड/वार्ताहर
बीड जिल्ह्य़ातील विविध विभागातील गैरव्यवहार प्रकरणात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असून जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आणि सत्ताधारी राजकीय नेत्यांचे का,कार्यकर्ते यांच्या संगनमतानेच कोरोना कालावधीत कोट्यावधी रूपयांच्या खरेदी केवळ कागदोपत्रीच खरेदी केल्याचे दाखवुन कोट्यावधी रूपयांचा अपहार करण्यात आला असून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा कोणतीही चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नाही, वरीष्ठ उपसंचालक डाॅ.एकनाथ माले यांनी सुद्धा वारंवार बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत प्रकरणात तसेच रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात तसेच प्रेरणा प्रकल्प अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात भ्रष्ट आधिका-यांची पाठराखण केली असून त्यांचीही उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी तसेच ज्यांच्यावर गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत असे जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य परिमंडल लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य मंत्री,आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक यांना करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनी आंदोलन, कारवाई न झाल्यास जनहीत याचिका
आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषणाद्वारे करण्यात येणार असून ठोस कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करण्यात येणार आहे.
