टिपू सुलतान शेर ए म्हैसूर नव्हे शेर ए भारत होते - एस.एम.युसूफ़

Beed

टिपू सुलतान शेर ए म्हैसूर नव्हे शेर ए भारत होते - एस.एम.युसूफ़

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हज़रत टिपू सुलतान यांच्याबाबत जी गरड ओकली त्याविरोधात राज्यभरात वातावरण दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टिपू सुलतान भारताचे पहिले स्वतंत्रता सेनानी, पहिले मिसाईल मॅन व पहिले शहीद होते. यामुळे ते फक्त शेर ए म्हैसूरच नव्हे तर शेर ए भारत होते.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, आपल्या भारत देशाचे पहिले स्वतंत्रता सेनानी आणि पहिले मिसाईल मॅन हज़रत टिपू सुलतान यांची आपल्या जिभेने विटंबना करणारा महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री नक्कीच माफीच्या लायक नाही. यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग ती शिक्षा संविधानाने विधानभवनात देण्यात येवो की, कायद्याने न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात येवो. पण शिक्षा ही द्यायलाच पाहिजे. नाहीतर कोणीही उठेल आणि ऐतिहासिक महापुरुषांबद्दल काहीही बरळत सुटेल. त्याचबरोबर मी केवळ आपल्या देशातील मुस्लिम बांधवांनाच नव्हे तर प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांना आवाहन करतो की, हज़रत टिपू सुलतान यांना जातीचा किंवा धर्माचा चष्मा लावून पाहू नका. त्यांची कर्तबगार कामगिरी, त्यांचे भारत देशाप्रती प्रेम पाहण्याकरिता योग्य आणि खरा इतिहास वाचा, समजून घ्या. मग कळेल की, आपल्या भारत देशासाठी बलिदान देणाऱ्यांमध्ये पहिले शहीद हज़रत टिपू सुलतानच होते. त्यामुळे केवळ मुस्लिमच नाही तर प्रत्येक सच्च्या भारतीयाने हज़रत टिपू सुलतान यांना फक्त शेर-ए-म्हैसूर न म्हणता शेर-ए-भारत म्हणायला हवे.
कारण त्यांनी सर्वप्रथम इंग्रजांसोबत लढलेले पहिले युद्ध म्हैसूर राज्य वाचवण्यासाठी नव्हे तर भारतावरील इंग्रजांचे आक्रमण रोखण्यासाठी लढले होते. तर इंग्रजांची नापाक पावले आणि नापाक हेतूपासून भारत देशाला वाचवण्यासाठी लढले होते व त्यातच ते शहीद झाले.
असे हज़रत टिपू सुलतान आपल्या भारत देशाचे पहिले स्वतंत्रता सेनानी, पहिले मिसाईल मॅन आणि पहिले शहीद होते. यामुळे त्यांना फक्त शेर-ए-म्हैसूर म्हणत केवळ एका राज्यापुरते का मर्यादित ठेवले जाते ? हेच कळत नाही. ते तर संपूर्ण भारताचे होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते संपूर्ण भारतासाठी जगले व शहीद झाले. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हज़रत टिपू सुलतान हे फक्त शेर-ए-म्हैसूर नव्हे तर शेर-ए-भारत होते. असे मत मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

Sharing

Visitor Counter