महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित

महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित
पहिल्या राज्यस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेत SBI आरसेटी बीडने जिल्ह्याची मान उंचावली
बीड/वार्ताहर
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने प्रथमच आयोजित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र (आरसेटी) मार्फत प्रशिक्षित उमेदवाराची राज्यस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धेची अंतिम फेरी सोलापूर येथे दि.12.01.2023 पार पडली यामध्ये एसबीआय आरसेटी बीडची मयुरी रवींद्र शिंदे यांनी शेळीपालन या विषयात राज्यस्तरावर प्रथम क्रमाक मिळवून बीड जिल्हयाची मान अभिमानाने उंचावली आहे.
उमेद अभियानातील आरसेटी मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी, राज्यस्तरीय कौशल्य व ज्ञान स्पर्धा घेण्यात आली, ही स्पर्धा MSRLM मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर सर, अवर सचिव MSRLM धनवंत माळी सर, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, दिनांक 07.01.2022 विभाग स्तरावर SBIRSETI परभणी या ठिकाणी स्पर्धा पार पडली, यामध्ये चार विविध गटात हि स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये 1. उद्योजकता विकास 2. महिलासाठी शिवणकला 3. शेळीपालन व 4. ब्युटी पार्लर या प्रकार विभाग होते. यात एसबीआय आरसेटी बीड मार्फत मयुरी शिंदे, सीमा किरडे व सरिता गिराम या प्रशिक्षणार्थिनी सहभाग होता.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली, 12 जानेवारी ला BOIRSETI सोलापूर या ठिकणी अंतिम स्पर्धा पार पडली या राज्यस्तरीय स्पर्धेत मयुरी रवींद्र शिंदे मु. नांदडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांचा शेळीपालन गटातून प्रथम क्रमांक आला,, दिनांक 21 में 2022 ते 30 में 2022 या कालावधीत त्यांनी पाटोदा आला, दिनांक 21 मे 2022 ते 30 मे 2022 या कालावधीत त्यांनी पाटोदा ममदापुर तालुका अंबाजोगाई या ठिकाणी शेळीपालनचे प्रशिक्षण पूर्ण केले, या बॅच ला डॉ. प्रदीप साळवे यांनी शेळीपालन विषयक प्रशिक्षण दिले, प्रमोद निनावे, संचालक एसबीआय आरसेटी बीड यांचे तसेच तालुका व्यवस्थापन कक्ष अंबाजोगाई यांचे मार्गदर्शन मिळाले,
उत्कृष्ट कामगगिरीने बीड जिल्हा, एसबीआय आरसेटी बीड आणि जिल्हा व्यवस्थापन कक्ष बीड, तालुका व्यवस्थापन कक्ष अंबाजोगाई यांचा राज्यस्तरावर बहुमान वाढवला आहे, त्यांना 11000 हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले सुनील कस्तुरे, राज्य संचालक आरसेटी, अशोक चव्हाण, राज्य संचालक आरसेटी, प्रीती पांडे मॅडम NESAR मोनिटरिंग सेल, शंकर कल्पेकर, परिक्षक चंद्रकांत जोशी, बीड,
मा. राधाबिनोद शर्मा, मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सल्लागार समिती, अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वसूदेव सोळुंके, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड त्रिवेणी भोंदे मॅडम, व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, प्रमोद निनावे, संचालक एसबीआय आरसेटी बीड सर्व आरसेटी बीड कर्मचारी, डॉ. प्रदीप साळवे, प्रशिक्षक सर्व अधीकारी कर्मचारी हे सर्व जण मयुरी रवींद्र शिंदे यांचे राज्यसरावर कौशल्य व ज्ञान स्पर्धे प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल अभिनंदन करत आहेत.
कौशल्य व ज्ञान स्पर्धा आरसेटी मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी MSRLM महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केली, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, व इतर बँकेच्या आरसेटी चे सहकार्य लाभले.








