धन्यवाद खासदार ताईसाहेब ,खरच मुंढे साहेबांची लेक शोभताय - विलास सातपुते

Beed

धन्यवाद खासदार ताईसाहेब ,खरच मुंढे साहेबांची लेक शोभताय - विलास सातपुते

बीड/वार्ताहर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून बीड जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी 94कोटी07 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. एखाद्याने साधा गल्लीतील सिमेंट रस्ता जरी मंजुर केला तर किमान 15दिवस बातमी लावतात.जाहीराती देवून श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत असतात. परंतु आपण विकासाचा ध्यास घेऊन कर्तव्य चोखपणे बजावतात. विशेषतः गाव तांडा वाड्या वस्त्या वरती आपलं खरोखरच विशेष लक्ष आहे. दिलेला शब्द पुर्ण करण्याचा प्रामाणिक पणा तुमच्या नेतृत्वात आहे. हा अनुभव जिल्ह्यातील जनता नेहमीच घेते. भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेद्रजी मस्के साहेबांकडे गावच्या काही विकास कामा संदर्भात यापुर्वी चर्चा केली होती.पिंपळनेर बाभुळवाडी ते गुधा हा रस्ता किती महत्त्वाचा आहे,याबद्दल माहिती सांगीतल्यावर त्यांच्या सुचनेनुसार आपल्याला परळी येथे निवासस्थानी भेटण्याचा योग आला. पिंपळनेर-बाभुळवाडी-गुंधा रस्त्यांची आठवण करून दिली. ताईसाहेब साहेब आपण म्हणाला होता की, मी तुमच्या गावावर नेहमीच लक्ष देईल. विकास निधी कमी पडु देणार नाही. रस्त्याची पहिली यादी जाहीर होईल. त्या यादीमध्ये आपल्या गावाचा नक्कीच समावेश असेल. लोकसभेच्या वेळी खासदार ताईंची बैठक काॅर्नर गावात होती तेव्हा मोठे बंधू प्रमेश्वर सातपुते सर किसान सेना शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी प्रस्ताविक भाषण करताना पिंपळनेर बाभुळवाडी ते गुंधा या रस्ताचा उल्लेख केला होता.आज तो शब्द खरा ठरला. साधरण 600 ते 700 मतदान आसणा-या गावातुन जाणारा या रस्त्याला आपण 6 कोटी रु. निधी मंजूर करून दिलात. कार्यकर्ते आणि जनता यांना दिलेला शब्द आपण पाळलात. आपले खेडेगावा विषयी सणारी काळजी आणी धडपड लक्षात आली आहे. आपण लाखो मतांची लिड घेऊन निवडून येता. मुंढे साहेब जसे सर्वांपर्यंत प्रर्यत विकासच्या माध्यमातून पोहचायचे आगदी त्याचप्रमाणे आपण देखिल खेडे वाड्या वस्त्यांवर लक्ष देऊ आहात म्हणून म्हणावे वाटतय,धन्यवाद खासदार ताईसाहेब तुम्ही खरच साहेबांची लेक शोभताय

Sharing

Visitor Counter