आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते नवगण राजुरी सर्कल मधील सहा कोटी विकासकामाचे उद्घाटन

Beed

आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते नवगण राजुरी सर्कल मधील सहा कोटी विकासकामाचे उद्घाटन

बीड/वार्ताहर

नवगण राजुरी सर्कल मधील विविध गावातील पावसाळ्यामध्ये पूल नसल्यामुळे रहदारीसाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत होते तेव्हा या गावातील लोकांनी  या पुलाचे काम करण्यासंदर्भात सन्माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांना भेटून होत असणारी अडचण लक्षात आणून दिली तेव्हा आदरणीय साहेबांनी सरकारदरबारी याचा पाठपुरावा करून विविध सहा कोटी रुपये कामाचे पूल मंजूर करून आणले व या पूलाच्या आज त्या कामाचे आदरणीय आ . विनायकराव मेटे साहेबांच्या हस्ते प्रत्यक्ष उद्घाटन संपन्न होत आहे

  यामध्ये अर्थसंकल्प मार्च 2018-19 या अर्थसंकल्पीय वर्षांमध्ये  येथील रामा -63 ते बेलुरा -नारायणगड ते कुर्ला प्रजिमा -18 रस्ता प्रजिमा -28 किमी 19/00  मध्ये पुलाचे बांधकाम करणे तसेच रामा -222 ते जोडवाडी - धारवंटा -साक्षाळपिंप्री - पारगाव सिरस - खापर पांगरी - बीड एमआयडिसी ते कुर्ला प्रजिमा -18 वर रस्ता प्रजिमा - 30 कि.मी. 4/300 मध्ये पुलाचे बांधकाम करणे तसेच

पारगाव सिरस येथील रामा - 222 ते जोडवाडी -धारवंटा साक्षाळपिंप्री -पारगाव सिरस - खापरपांगरी - बीड एमआयडिसी ते कुर्ला प्रजिमा -18 वर रस्ता प्रजिमा -28 कि.मी. 19/00 मध्ये पुलाचे बांधकाम इत्यादी आहे . यामध्ये बेलुरा येथील दोन पूल असुन 150.00 लक्ष , तसेच सोनगाव येथील मुख्य रस्त्यावरील पूल100.00 लक्ष व पारगाव शिरस येथील मुख्य पूल350.00 लक्ष असे एकूण चार पुलाचे सहा कोटी कामाचे उद्घाटन आज संपन्न होत आहे

Sharing

Visitor Counter