बीडच्या नागरिकांना वेड्यात काढनं बंद करा !-सय्यद अशफाक

बीडच्या नागरिकांना वेड्यात काढनं बंद करा !-सय्यद अशफाक
बीड/वार्ताहर
आगामी निवडणूक लक्षात घेत शहरातील नेतेमंडळी कळून वेगवेगळे स्टंटबाजी पाहण्यास मिळत आहे तर रोडच्या कामाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे परंतु गेल्या पाच वर्षापासून जे काम करणे गरजेचे होते ते अवघ्या निवडणुकीच्या तोंडावरच का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजूनही शहरात धुळीचे साम्राज्य पाहण्यास मिळत आहे तर काही रोडचे फक्त नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले आहे तर काही भागात एकाच रोडचे वेगवेगळ्या नेत्याकडून भूमीपूजन दोनदा करण्यात आलं याचा अर्थ लोकांना वेड्यात काढतणे का? कव्हर लोकांना वेड्यात काढणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. श्रेय कुणी हि घ्या परंतु विकास काम करा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत नागरिक तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवल्याशिवाय राहणार नाही असा सय्यद अश्फाक यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.