ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बीड पोलिसांची प्रशंसा
Beed

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बीड पोलिसांची प्रशंसा
बीड/प्रतिनिधी
विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम यांनी वार्षिक पब्लिकेशन मध्ये बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.हर्ष पोद्दार यांच्या कामगिरीचा उल्लेख करत लेख प्रकाशित केला आहे. यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील बीड जिल्ह्याच्या 2019 मधील राज्य निवडणुका बीड पोलिसांनी उत्कृष्ट हाताळल्या बाबतची विशेष प्रशंसा केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सन 2009 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत मास्टर ऑफ लॉ यापदवीचे शिक्षण घेतले आहे.
