रमाई आवास योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळू उपलब्ध करून द्या-शेख बंन्नुपटेल 

Beed

रमाई आवास योजनांतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळू उपलब्ध करून द्या-शेख बंन्नुपटेल 

 बीड/वार्ताहर 

आर्थिक दुर्बल घटकांकरीता असलेल्या शासनाच्या गृहनिर्माण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना स्वतः च्या घराच्या बांधकामासाठी लाभार्थ्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब यांना पाठवून आरक्षित वाळू घाट आरक्षीत करून खुला करावा व 5 ब्रास बाळु झिरो रॉयल्टीने उपलब्ध करुन देण्यात यावे.

गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजनेमधील आर्थिक दुर्बल घटकात असलेल्या लाभार्थ्यांना वरील योजनेतून सन 2018-19 व 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये घरकुले मंजूर झालेली असतांना त्यांना घरकुल बांधण्यासाठी वाळु उपलब्ध होत नसल्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे व महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2019 मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय घेतला होता. पण त्याची काटेकोरपणे गेवराई तालुक्यात व बीड जिल्ह्यामध्ये कुठेच अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे लाभार्थ्यांनी वाळु अभावी योजनेतील घरकुल अद्याप बांधून पूर्ण केलेली नाहीत. तसेच वरील लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टीने 5 ब्रास बाळू उपलब्ध करून देण्यात यावी व या कामी त्यांची यादी व प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे करुन वाळू घाट आरक्षीत करण्यात यावा व लाभार्थ्यास झिरो रॉयल्टीने 5 ब्रास वाळू प्रत्येकी उपलब्ध करून देण्यात यावी. तरी आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना 15 दिवसांच्या आत झिरो रॉयल्टीने प्रत्येक लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी.व अन्यथा आपल्या कार्यालयावर लोकशाहीमार्गाने आंदोलन करण्यात येईल असे आव्हान भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे गेवराई तालुका अध्यक्ष शेख बंन्नुपटेल यांनी केले.

Sharing

Visitor Counter