जानुन बुजून बांधकाम कामगारांनाच्या अर्जावर सही शिक्का देण्या टाळाटाळ- एआयएमआयएम बीड 

Beed

जानुन बुजून बांधकाम कामगारांनाच्या अर्जावर सही शिक्का देण्या टाळाटाळ- एआयएमआयएम बीड 

बीड/वार्ताहर 

नगर परिषद बांधकाम विभागातील अधिकारी व्हि.एस.महाजन हे जाणुन बुजून बांधकाम कामगारांच्याअर्जावर सही व शिक्का देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच अनेक दिवसापासुन हजारो गरजु कामगारांचे फॉर्म नगर परिषद मध्ये धुळ खात पडले आहे.बांधकाम कामगार मजुरांच्या नवीन नाव नोंदणी व अर्ज नूतनीकरण करण्यासाठी व मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी नगर परिषदेचा सही व शिक्का आवश्यक आहे परंतु नगर परिषदेच्या मंदगतीच्या कामामुळे शासकीय योजने बांधकाम मजुरांना व त्यांच्या मुलांना शाकीय लाभापासुन वंचित राहावे लागत आहे. तसेच नवीन नाव नोंदणी अर्जावर व नुतनीकरण अर्जावर व्हि.एस.महाजन यांची सही व शिक्का घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार व कल्याणकारी मंडळ बीड यांच्याकडे घेऊन गेल्यास तेथील कर्मचारी असे सांगतात की व्हि.एस महाजन यांची सही डुब्लीकेट आहे असे सांगुन टाळाटाळ करत आहे. तरी मा.साहेबांना विनंती की आमच्या या आडचणीकडे वैयक्तीक लक्ष देऊन आमची आडचण दुर करावी.असे निवेदन देण्यात आले जर आमचे मागणी मान्य नाही झाली तर, AIMIM बीड जिल्हा अध्यक्ष अॅड शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वखाली नसता लोकशाही मार्गाने आम्ही आपल्या बीड नगरपालिका च्या कार्यालयासमोर आंदोलनचा करण्यात येईल असा इशारा AIMIM बाधंकाम कामगार बीड शहरध्यक्ष सय्यद बासेद, वार्ड क्रमांक19 चे अध्यक्ष शेख नेहाल अहेमद, शेख हबीब भाई, आतार रहीम भाई,शेख युसुफ भाई, पठाण अझर भाई, पठाण नसीर भाई, शेख आरिफ भाई, आदी दिला आहे.

Sharing

Visitor Counter