ठाकरे सरकारमधील ‘त्या’ कोरोना बाधित ज्येष्ठ मंत्र्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले

ठाकरे सरकारमधील ‘त्या’ कोरोना बाधित ज्येष्ठ मंत्र्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले
औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे
महाराष्ट्रमहाराष्ट्रहोमठाकरे सरकारमधील ‘त्या’ कोरोना बाधित ज्येष्ठ मंत्र्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले
औरंगाबादः महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील कोरोना बाधित आढळलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांना आज उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. या मंत्र्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल काल पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यांच्यावर खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हे मंत्री विधान परिषद निवडणुकीनिमित्त दोन आठवडे मुंबईत होते. विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर याच आठवड्यात ते आपल्या जिल्ह्यात परतले होते. या मंत्र्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा बाधा झाली आहे. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे या मंत्र्यांनाही संसर्ग झाला आहे. आज सकाळी विशेष ऍम्बुलन्सने या मंत्र्यांना नांदेडहून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
